Tue, Sep 25, 2018 01:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रविवारी घडणार सुपरमूनचे दर्शन!

रविवारी घडणार सुपरमूनचे दर्शन!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी 
येत्या रविवारी 3 डिसेंबर रोजी म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात सुपरमून दिसणार असल्याची माहिती प्रसिद्ध खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. 

पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर त्याला  सुपरमून म्हटले जाते. चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3 लक्ष 84  हजार किलोमीटर अंतरावर आहे, परंतु  यावेळी चंद्र पृथ्वीपासून 3 लक्ष 57  हजार कि.मी. अंतरावर येणार आहे. सुपरमून योगाच्यावेळी पौर्णिमेचे चंद्रबिंब नेहमीपेक्षा सुमारे चौदा टक्के मोठे आणि सोळा टक्के जास्त तेजस्वी दिसते. सन 1979 मध्ये रिचर्ड नोले यांनी पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीजवळ आलेल्या चंद्रास सर्वप्रथम   सुपरमून असे नाव दिल्याची माहिती सोमण यांनी दिली.  रविवारी श्री दत्तजयंती आहे. यादिवशी सायंकाळी  5 वाजून 56 मिनिटांनी पूर्वेला पौर्णिमेचा चंद्र रोहिणी नक्षत्रात  असताना उगवेल. मार्गशीर्ष पौर्णिमा रात्री 9 वाजून 17 मिनिटांनी पूर्ण होईल. त्यावेळी चंद्रबिंब नेहमींपेक्षा मोठे व तेजस्वी दिसेल. रात्रभर आकाशात दर्शन देऊन चंद्र सोमवारी  सकाळी  7 वाजून 25  मिनिटांनी मावळेल. रविवारी रात्री 9 वाजून 17  मिनिटांनी पूर्व आकाशात सर्वांना साध्या डोळ्यांनी सुपरमूनचे दर्शन घेता येईल.