Wed, May 27, 2020 01:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इंदुरीकर महाराजांचे विधान अशास्त्रीय : हमीद दाभोलकर

इंदुरीकर महाराजांचे विधान अशास्त्रीय : हमीद दाभोलकर

Last Updated: Feb 18 2020 1:48AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

गर्भलिंग निदानावर भाष्य केल्यामुळे इंदुरीकर महाराजांवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. वक्तव्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची अनेकांनी मागणी केली. या प्रकरणावर आता अंनिसचे हमीद दाभोळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इंदुरीकर महाराजांनी केलेले विधान हे अशास्त्रीय स्वरुपाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

दाभोलकर म्हणाले की, इंदुरीकर महाराजांच्या गर्भलिंग निदान वक्तव्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. त्यांनी जे विधान केले हे तर अशास्त्रीय स्वरुपाचं विधान आहे. मुलाचं आणि मुलीचं लिंग असे ठरत नाही हे विज्ञानाने स्पष्ट केले आहे. 

अधिक वाचा : मोहन भागवतांवर सोनम कपूर भडकली

इंदुरीकर महाराज त्यांच्या कीर्तनातून समाज प्रबोधन करतात. अनेक महत्त्वाच्या गोष्टी ते किर्तनातून मांडतात. मात्र, एखादी चूक आपल्याकडून घडली असेल ती दुरुस्ती केली पाहिजे. त्यात कुठलाच कमीपणा नाही. इंदुरीकर महाराजांनी त्यांच्याकडून झालेली चूक दुरूस्त करून घेणे गरजेचे आहे. 

इंदुरीकर महाराजांनी आपल्या एका किर्तनात मुलगा होण्यासाठी आणि मुलगी होण्यासाठी ठराविक दिवशी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत वक्तव्य केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते, असे विधान केले होते. या विधानानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. 

अधिक वाचा : पुणे : आईला मारहाण करणाऱ्या पित्याचा मुलाकडून खून