Wed, Feb 20, 2019 16:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खडवली रेल्वे स्थानक येथे बेदम मारहाणीत हमालाचा मृत्यू

खडवली रेल्वे स्थानक येथे बेदम मारहाणीत हमालाचा मृत्यू

Published On: Feb 12 2018 9:15PM | Last Updated: Feb 12 2018 9:15PMकल्याण : वार्ताहर

हमालाला बेदम मारहाण करत हत्या केल्याची घटना खडवली रेल्वे स्थानक परिसरात घडली. कानू जाधव( वय, 64) असे मृत्‍यू झालेल्‍या हमालाचे नाव आहे. तर धनंजय सिन्हा (वय, 54) असे संशयित आरोपीचे नाव असून तो नेव्हीमधून सेवा निवृत्त झाला आहे.  कल्याण रेल्वे पोलिसानी धनंजय सिन्हा विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

कानू जाधव हे खडवली रेल्वे स्थानकात हमाली करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. जाधव यांचे आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास काही कारणावरून याच परिसरात राहणाऱ्या धनंजय सिन्हा याच्याशी वाद झाला. या वादातून सिन्हा याने जाधव यांना बांबूने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी जमलेल्या नागरिकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सिन्हा  याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.