Tue, May 21, 2019 04:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गुजरातेत हंगामा, नागपुरात मात्र शांत शांत...

गुजरातेत हंगामा, नागपुरात मात्र शांत शांत...

Published On: Dec 18 2017 12:08PM | Last Updated: Dec 18 2017 12:07PM

बुकमार्क करा

नागपूर: उदय तानपाठक

गुजरातच्या निकालांचे पडसाद नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात कसे उमटतात याबद्दल उत्सुकता असताना आश्चर्यकारक चित्र दिसले. आज सभागृहाचे कामकाज होणारच नाही असे वाटत असताना शांततेत कामकाज सुरू झाले आहे. ना भाजपचा विजयाचा जल्लोष ना काँग्रेसची खिजवणारी घोषणाबाजी! 

विधानभवनाच्या आवारात तर केवळ गुजरातचीच चर्चा सुरू आहे. प्रत्येकजण दुसऱ्याला केम छो असे गमतीत विचारतो आहे. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांना गुजरात निवडणुकीविषयी विचारले असता ते म्हणाले की 'आता इथे आमच्याशी चांगले वागतील भाजपावाले'. याबाबत मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभू यांना विचारले असता त्यांनी सगळे निकाल येऊ देत मग बोलतो असे सांगितले.