Tue, Jul 16, 2019 21:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संपूर्ण राज्‍यात गुढीपाडव्याचा उत्‍साह

संपूर्ण राज्‍यात गुढीपाडव्याचा उत्‍साह

Published On: Mar 18 2018 8:28AM | Last Updated: Mar 18 2018 8:28AMमुंबई : पुढारी ऑनर्लान

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आज (दि. १८ मार्च) राज्‍यभरात मोठ्या उत्‍साहात साजरा होत आहे. गुढीपाडव्यानिमित्‍त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील गिरगाव येथे सकाळी ७.३० वाजता नववर्ष दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. तसेच सकाळी ८ वाजता स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे नववर्ष स्वागतयात्रा आणि चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. दहिसर येथे हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

गिरगाव, डोंबिवली आणि ठाण्यात गुढीपाढव्यानिमित्‍ताने शोभायात्रा काढण्यात येत आहेत. या यात्रांमध्ये ढोल-ताशांचा नाद, एका तालात नाचवल्या जाणाऱ्या ध्वजांची आरास अणि पारंपरिक पोशाखासह भगवे फेटे बांधून मुंबईकर शोभायात्रेत सहभागी झाले आहेत. तर, प्रत्‍येक घरासमोर रांगोळ्यां काण्यात आल्‍या आहेत. महिला आणि पुरुष मोटारसायकलींवर स्वार होवून शोभायात्रेचा आनंद घेत आहेत. 
या शोभायात्रांमध्ये विविध ढोलपथकांची गर्जना, ध्वजपथकांची आकर्षक सादरीकरणे, तलवारबाजी, दांडपट्टा विविध प्रात्यक्षिके, या शोभायात्रांमध्ये पाहायला मिळत आहे. 

‘‘मंद वारा वसंताची चाहूल घेऊन आला.. पालवी मधल्या प्रत्येक पानात नवंपण देऊन गेला.. त्याने नवीन वर्षाची सुरुवात ही अशीच केली..नाविन्याच्या आनंदासाठी तो मंगल गुढी घेऊन आला.. अशा या आनंदमयी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.’’ असे संदेश गुढीपाढव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावरही फिरत आहेत. तसेच लोक ऐकमेकांना भेटूनही शुभेच्छा देत आहेत.

Tags : gudi padwa 2018, maharashtra