Sun, Jul 21, 2019 08:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खालापुरात गोहत्या करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

खालापुरात गोहत्या करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

Published On: Jan 10 2018 1:58AM | Last Updated: Jan 10 2018 1:08AM

बुकमार्क करा
खालापूर : प्रतिनिधी

खालापूर तालुक्यात गोवंश हत्येचे सत्र थांबता थांबेना असे चित्र असून मंगळवारी 6 बैल आणि 2 गायींची कत्तल करून मांस नेणार्‍या टोळीचा खालापूर पोलिसांनी पर्दाफाश करत 7 जणांच्या टोळीला गजाआड केले आहे. 
खालापूर तालुक्यात वावर्ले, तांबाटी आणि भिलवले ठाकूरवाडीत रात्रीच्या वेळेस गोवंश कत्तल करणारी टोळी कार्यरत असल्याचे अनेक घटनांवरुन पुढे आले आहे. 26 डिसेंबरला वावर्ले हद्दीत पहिला प्रकार घडला होता. त्यावेळी 3 बैल व एका गायीची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी जनावरांना ब्रेडमधून गुंगीचे औषध देवून कत्तल करण्यात आली व नंतर मांस काढून नेण्यात आले. त्यानंतर खोपोली -पेण रोडवर तांबाटी येथे वर्षाच्या पहिल्या दिवशी एक गाय व बैलांची कत्तल झाल्याचे समोर आले. 4 जानेवारीला तिसरा प्रकार भिलवले येथे घडला. यावेळी पारले बिस्किटांवर गुंगीचे औषध टाकून 3 बैलांना खायला देण्यात आले व नंतर हत्या करण्यात आली होती. यासंदर्भात तपासासाठी खालापूर पोलीस निरिक्षक जे. ए. शेख यांनी 4 पोलीस पथके तयार करून पोलीस निरिक्षक स्वतः टोळीच्या मागावर होते. सोमवारी रात्रौ मिळालेल्या माहितीवरुन पथकाने तळोजा, मुंब्रा, कल्याण भागातून जनावरांची हत्या करून मांस विकणार्‍या 7 जणांच्या टोळीला ताब्यात घेतले. सर्व आरोपींना मंगळवारी खालापूर प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता 15 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.