Sun, Aug 25, 2019 12:17



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चंद्रकांत पाटील, तावडे यांच्याकडून राहीला शुभेच्छा

चंद्रकांत पाटील, तावडे यांच्याकडून राहीला शुभेच्छा

Published On: Sep 11 2018 1:38AM | Last Updated: Sep 10 2018 11:48PM



मुंबई : आशियाई 

स्पर्धेत नेमबाजीमध्ये सुवर्णपदक मिळवून देणार्‍या राही सरनोबत हिने सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. पाटील आणि तावडे यांनी राहीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तावडे यांच्या दालनात झालेल्या भेटीवेळी क्रीडामंत्री म्हणाले, 2020 मध्ये होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत राही सरनोबत हिने भारतासाठी खेळताना अशीच सुवर्ण कामगिरी करून समस्त महाराष्ट्रवासियांच्या पदकाच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. येणार्‍या काळात स्पर्धेसाठी तयारी करीत असताना महाराष्ट्र शासनामार्फत तिला संपूर्ण सहकार्य देण्यात येईल. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही राहीचा आपल्या दालनात सत्कार केला आणि यापुढील सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या. तसेच कोल्हापूरचे नाव जागतिक पातळीवर नेल्याबद्धल तिचे अभिनंदन केले.