होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लाईव्ह अपडेटः ग्रामंपंचायत निवडणूक निकाल

लाईव्ह अपडेटः ग्रामंपंचायत निवडणूक निकाल

Published On: May 28 2018 1:44PM | Last Updated: May 28 2018 3:29PMमुंबईः प्रतिनिधी

राज्यातील विविध ३१ जिल्ह्यांतील ५६१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व १७४ ग्रामपंचायतींमधील २३७ रिक्‍त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी काल मतदान झाले. आज सकाळी १० वाजल्यापासून विविध ग्रामपंचायतींचे निकाल येण्यास सुरूवात झाली.

लाईव्ह अपडेट

*सांगली :
कवठेमहांकाळ तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 6 गावच्या सरपंचपदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी झेंडा फडकवला. खासदार संजय पाटील यांच्या भाजपने आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकी 4 सरपंचपदावर कब्जा मिळविला. एका गावात काँग्रेसचे तर एका गावात संमिश्र पॅनल विजयी झाले.

*नाशिक : दापूर ग्रामपंचायत सदस्यपदी शारदा आव्हाड यांची निवड

* सांगलीः आटपाडी तालुक्यात भाजप 7 शिवसेना 6 काँग्रेस 2 ग्रामपंचायतवर विजयी, आटपाडीची प्रतिष्ठेची लढत सेनेने जिंकली

* कोल्हापूरः गारगोटी ग्रामपंचायतीत सत्तांतर-देसाई-पाटील आघाडीला १२ तर आबिटकर आघाडीला ५ जागा

*सांगलीः कवठेमहांकाळ तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 6 गावच्या सरपंचपदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी झेंडा फडकवला. खासदार संजय पाटील यांच्या गटाने आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या गटांनी प्रत्येकी 4 सरपंचपदावर कब्जा मिळविला. एका गावात काँग्रेसचे तर एका गावात संमिश्र पॅनल विजयी झाले.

*कोल्हापूरः राजापूर ता.शिरोळ येथील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत  मित्रपक्षांच्या अक्काताई बाळगोंडा पाटील या विजयी झाल्या.

* सिंधुदुर्गः वर्दे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा

* महाडमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे वर्चस्व सिद्ध, अकरा ग्रामपंचायतीवर भगवा फडकला

*कोल्‍हापूर : आजरा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सत्ताधार्‍यांच्या बाजुने कौल
    
*कोल्‍हापूर : पन्हाळा तालुक्यात सरपंच पदी तीन ठिकाणी जनसुराज्य शक्ति पक्षाचे तर शिवसेना दोन ठिकाणी तर चार ठिकाणी स्थानिक आघाड्यांचे उमेदवार विजयी, तीन ठिकाणी सत्तांतर

*कोल्‍हापूर : गारगोटी ग्रामपंचायतीत सत्तांतर, १२ जागा आघाडीला; ५ जागा सत्ताधारी गटाला, राहुल देसाई-के. पी. पाटील आघाडीची सत्ता सरपंचपदाचे उमेदवार संदेश भोपळे विजयी

*सांगली : नेलकरंजी ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे युवा नेते जयदीप भोसले यांचे वर्चस्व, सरपंच पदासाठी बाबासाहेब भोसले विजयी

*कोल्‍हापूर : उदगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग तीनमधील पोट निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार प्रा. राजाराम वरेकर विजयी

*सांगलीः आटपाडी तालुक्यातील करगणी, मिटकी, पिंपरी ग्रामपंचायत शिवसेनेकडे

पालघर, भंडारा व गोंदिया हे तीन जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यांतील मतमोजणी आज सुरू आहे. पालघर, भंडारा व गोंदिया या तीन जिल्ह्यांत लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारीच मतदान असल्यामुळे या जिल्ह्यांत ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. मतदान झालेल्या जिल्हानिहाय

ग्रामपंचायतींची संख्या. (कंसात पोटनिवडणुकांसाठी मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या)
ठाणे 4 (8), पालघर 2 (9), रायगड 159(5), रत्नागिरी (1), सिंधुदुर्ग 2, नाशिक 20(7), धुळे 7, जळगाव 7(5), अहमदनगर 70(12), नंदूरबार (2), पुणे 80(15), सोलापूर 3(22), सातारा 15(4), सांगली 71(5), कोल्हापूर 62(11), औरंगाबाद 4(6), बीड 2(1), नांदेड 3(6), उस्मानाबाद 1(7), परभणी 1(1), जालना (3), लातूर 4 (3), हिंगोली (1), अमरावती (6), अकोला 1(4), यवतमाळ 25(6), वाशीम (2), बुलडाणा (3), वर्धा 14 (5), चंद्रपूर (2), भंडारा 4 (1), गोंदिया (5) आणि गडचिरोली (6) एकूण 561(174).