Fri, Jan 18, 2019 04:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यपालांचं अभिभाषण गुजरातीत; तावडे अनुवादक

राज्यपालांचं अभिभाषण गुजरातीत; तावडे अनुवादक

Published On: Feb 26 2018 2:42PM | Last Updated: Feb 26 2018 2:44PMमुबंई : पुढारी ऑनलाईन

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (सोमवार) सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केलेले अभिभाषण मराठीऐवजी गुजराती भाषेत ऐकू आल्याने विरोधक संतप्त झाले आहे. त्यांच्या भाषणादरम्यानच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

संबंधित बातम्या वाचा 

मराठीच्या मुद्यावर विरोधकांकडून सरकारची कोंडी; मुख्यमंत्र्यांचा माफीनामा

सरकारने मराठी भाषेचा अपमान केला : मुंडे (व्हिडिओ)

राज्य सरकारला मराठीचे वावडे; गुजरातीचा पुळका

विरोधकांचा रोष वाढत चालल्‍यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेच्या नियंत्रण कक्षात जाऊन स्वत: मराठी अनुवाद केला. परंतु, तोपर्यंत विरोधक चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी करत सभात्याग केला. विरोधकांचा गोंधळ सुरु असतानाच राज्यपालांचं भाषण सुरु होतं.

‘‘राज्‍यपालांचे भाषण सुरु असताना मराठी अनुवादक विधानसभेत नव्हता मात्र, ही गोष्‍ट लक्षात येताच मी स्‍वत: राज्‍यपालांच्या भाषणाचा मराठीत अनुवाद केला. तसेच या प्रकाराला जे जबाबदार असतील त्‍यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.’’ असे स्‍पष्‍टीकरण विनोद तावडे यांनी दिले.