होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्य सरकारला मराठीचे वावडे; गुजरातीचा पुळका

राज्य सरकारला मराठीचे वावडे; गुजरातीचा पुळका

Published On: Feb 26 2018 1:53PM | Last Updated: Feb 26 2018 1:53PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्यपालांच्या अभिभाषणावरून वादाला तोंड फुटले आहे. राज्यपालांच्या अभिषणाचा अनुवाद मराठीत न करता गुजराती भाषेत करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या गुजराती प्रेमावर जोरदार टिका होताना दिसत आहे. विरोधकांनी हा मराठीचा अवमान असल्याचे म्हटले आहे. 

संबंधित बातम्या वाचा 

मराठीच्या मुद्यावर विरोधकांकडून सरकारची कोंडी; मुख्यमंत्र्यांचा माफीनामा

सरकारने मराठी भाषेचा अपमान केला : मुंडे (व्हिडिओ)

आजपासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्‍पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनात सादर होणारे राज्‍यपालांचे अभिभाषण मराठीत करण्यात आले नाही. भाषणाचा अनुवाद मराठीत अपेक्षित होता. पण, तो गुजराती भाषेत करण्यात आला. आता गुजराती भाषाच का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून, यावरून राज्य सरकारला धारेवर धरले जात आहे. गुजराती भाषकांविषयी सरकारला अचानक वाटू लागलेली आत्मियता, या विषयी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वी अनेक भाषणांतून मांडली आहे. 

दर वर्षी राज्यपालांच्या भाषणाचा मराठीमध्ये अनुवाद केला जातो. पण, यंदा मराठीला टाळून गुजरातीमध्ये अनुवाद करण्यात आला. जणू सरकारला मराठीचे सरकारला वावडे असून, गुजरातीचा पुळका आला आहे, अशी टिका होऊ लागली आहे. विरोधकांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत धरणे धरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे.