Mon, Jun 24, 2019 17:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकारची निवडणूक तयारी सुरू

सरकारची निवडणूक तयारी सुरू

Published On: Dec 13 2017 2:36AM | Last Updated: Dec 13 2017 1:36AM

बुकमार्क करा

मुंबई : चंद्रशेखर माताडे 

कर्जमाफीसह शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर हल्लाबोल मोर्चा काढुन विरोधकांनी आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले असतानाच सरकारही विकासमाकांच्या माध्यमातुन विरोधकांना उत्तर देण्याच्या तयारीला लागले आहे. नागरी भागात येणार्‍या राज्यातील निम्म्या मतदारसंघांवर सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे.  27 महापालिकांत ठळक दिसतील  अशी कामे करण्यासाठी  सरकारने घसघशीत अनुदान  देण्याचा निर्णय घेतला  आहे. मुंबई महापालिकेला  50 टक्के तर राज्यातील उर्वरित 26 महापालिकांना तब्बल 75 टक्के अनुदान मिळणार आहे. 

राज्यातील महापालिका क्षेत्रात सोयीसुविधांचा विकास अशी योजना राबविण्यात येणार आहे. सध्याच्या निकषानुसार  सर्व महापालिकांना 50 टक्के स्वत:चा हिस्सा भरणे बंधनकारक आहे. मात्र महापालिकांना ही रक्कम भरणे शक्य होत नाही व राज्य सरकारने दिलेल्या निधीचा योग्य प्रकारे वापर  होत नाही. म्हणुन सरकारकडून दिल्या जाणार्‍या अनुदानाच्या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सर्व महापालिकांना ही योजना लागु करण्यात आली आहे. 

नागरिकांच्या ठळक लक्षात रहातील किंवा नागरिकांचे  त्या कामाकडे स्पष्टपणाने  लक्ष जाईल अशी कामेच हाती घेण्यात यावीत असे आदेश सरकरने दिले  आहेत. त्यासाठी अ प्लस महापालिकेला 50 टक्के विशेष अनुुदान देण्यात येणार आहे. तर अ, ब, क व ड वर्ग महापालिकांना विशेष अनुदान म्हणुन योजना खर्चाच्या 75 टक्के रक्कम मिळणार आहे. 

योजना मंजूर करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करण्यात आली आहे.योजना  मंजूर करताना महापालिकेची आर्थिक परिस्थीती, स्थानिक पातळीवरची गरज व प्राथमिकता, भौगोलिक परिस्थीती,  नागरीकरणाचा दर,  व हागणदरीमुक्त स्वच्छ शहरांची निर्मिती  या निकषांचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे.