Fri, Nov 24, 2017 20:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तुरडाळ मिळणार ५५ रुपये किलो 

तुरडाळ मिळणार ५५ रुपये किलो 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : वृत्तसंस्था 

महागाईच्या झळा सोसणार्‍या सर्वसामान्यांना आता दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने तुरडाळ ५५ रुपये किलोने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकर्‍यांकडून सरकारने २५ लाख क्‍लिंटल तूर डाळ खरेदी केली आहे. त्याच डाळीची स्वस्तात विक्री केली जाणार आहे. अन्‍न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने हा प्रस्ताव ठेवला आहे. 
सध्या बाजारात तूर डाळ ९० ते ११० रुपये दराने मिळत आहे. यंदा तुरीचे जास्‍त उत्‍पादन झाले असल्‍याने बाजारात भाव पडले आहेत. त्‍यामुळे सरकारने पाच हजार पन्नास रुपयांची किमान आधारभूत किंमत देत डाळ खरेदी केली आहे. 

डाळीची देखभाल, वाहतूक, खरेदी, पॅकिंग यासाठी सरकारला प्रतिकिलो मागे ७५ रुपये इतका खर्च येतो. आता कमी किंमतीत ही डाळ विक्री करणार असल्याने ३६० कोटी रुपयांचा तोटा सरकारला होणार असल्याची माहिती एका अधिकार्‍याने दिली. 

राज्यात यंदा ११.७ लाख मेट्रिक टन तूर डाळीचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा जवळपास दुप्पट आहे. 

पाकिटावर असणार एमआरपी
तूर डाळ एक आणि पाच किलोच्या पाकिटात भरून व्यापार्‍यांना दिली जाईल. इतकेच नव्हे तर, व्यापार्‍यांनी जादा पैसे घेऊ नयेत म्हणून पाकिटावर ५५ रुपये किलो अशी एमआरपी देखील छापली जाईल.