Wed, Jul 17, 2019 20:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फोनमधील मेमरी वाढवण्याचा स्मार्ट उपाय

फोनमधील मेमरी वाढवण्याचा स्मार्ट उपाय

Published On: Dec 09 2017 2:08AM | Last Updated: Dec 09 2017 2:08AM

बुकमार्क करा

मुंबई : 

गुगलने नुकतेच ‘फाइल्स गो’ हे अ‍ॅप सादर केले. हे अ‍ॅप स्मार्टफोनमधील जागा मोकळी करण्यासाठी, फाइल्स शोधण्यासाठी आणि इतरांबरोबर सहजपणे शेअर करण्यासाठी मदत करू शकते. सध्या 16 जीबी किंवा 32 जीबी स्टोरेज असलेले फोन अधिक लोकप्रिय होत आहेत. परंतु जगभरातील अनेक फोन हे 4 जीबी पेक्षा कमी स्टोरेज असलेले आहेत. ग्राहकांना नेहमी त्यांच्या फोनवरील ‘स्टोरेज स्पेस’ ‘फ्री’ ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. फाईल हटविणे किंवा ठेवणे यामधील एका पर्यायाची निवड त्यांना करावी लागते.

‘फाइल्स गो’च्या वापरामुळे ग्राहकांना सरासरी 1 जीबी एवढी जागा जादा मिळते. तसेच अनेक फायली शेअर करता येतात, क्लाउडवर बॅकअप घेणेही याद्वारे करता येते. ‘फाइल्स गो’ अँड्रॉईड 5.0 वरील आवृत्तीवर चालते. हे अ‍ॅप ऑफलाइनदेखील चालते, असे ‘गूगल’तर्फे सांगण्यात आले आहे.