होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आज स्कूलबस बंद!

आज स्कूलबस बंद!

Published On: Jul 20 2018 1:40AM | Last Updated: Jul 20 2018 1:34AMमुंबई : प्रतिनिधी

ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनने शुक्रवारपासून पुकारलेल्या मालवाहतूकदारांच्या बेमुदत संपाला स्कूल बस मालक -चालकांनीही एक दिवसाचा पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरांतील स्कूल बसेस बंद राहणार आहेत. 

हा बंद विविध मागण्यांसाठी असून स्कूल बस, खासगी बस, ट्रक, टेम्पो, प्रायव्हेट कॅब आदींचा समावेश असेल असे स्कूल बस अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनकडून स्पष्ट केले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या जीएसटी अंतर्गत आणण्यासाठी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने देशभरात चक्काजामची हाक दिली आहे. या चक्काजाम आंदोलनास स्कूल बस ओनर्स असोसिएशनतर्फे पाठिंबा दर्शविण्यात आला असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी म्हटले आहे.