Thu, Apr 25, 2019 03:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्लास्टिक बाटली द्या, पाच रुपये मिळवा!

प्लास्टिक बाटली द्या, पाच रुपये मिळवा!

Published On: Jul 07 2018 10:01AM | Last Updated: Jul 07 2018 10:01AMमुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारने संपूर्ण प्लास्टिक बंदी केली आहे. याचाच भाग म्हणून रेल्वेनेही प्लास्टिक बंदीसाठी पुढाकार घेतला आहे. आता स्थानकावर बॉटल क्रशर मशिन बसवल्या आहेत. शिवाय या क्रशर मशिनमध्ये बॉटल टाकणार्‍यांना रेल्वेकडून खास ऑफर म्हणून बॉटलच्या बदल्यात पाच रुपये देण्याचा विचार आहे. 

बरेच जण येता-जाता इतरत्र प्लास्टिकची बाटली फेकून देतात. सरकारने आता प्लास्टिकवरच बंदी घातली आहे. तसेच प्लास्टिक बाटल्या अशा इतरत्र फेकल्यास दंड होण्याचीही शक्यता आहे. भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी खास ऑफर आणली आहे. प्रवाशांजवळ असणारी जुनी प्लास्टिकची बाटली क्रशरमध्ये टाकल्यावर प्रवाशांना पाच रुपये परतावा मिळतो.