Thu, Apr 18, 2019 16:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबई विमानतळास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्या : जितेंद्र आव्हाड

नवी मुंबई विमानतळास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्या : जितेंद्र आव्हाड

Published On: Feb 18 2018 7:00PM | Last Updated: Feb 18 2018 7:03PMमुंबई : प्रतिनिधी

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीटीवरील चौथ्या टर्मिनलचं लोकार्पण आज (रविवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूक परिवहन आणि बंदरे विकास मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री अशोक गजपती, राज्यपाल विद्यासागर राव, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आ.प्रशांत ठाकूर व्यासपीठावर उपस्‍थित होते. 

या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होताच राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी या विमानतळास छत्रपती संभाजी महाराज असे नाव द्यावे अशी मागणी केली आहे. त्यांनी आपल्या ट्टिवटर अकांऊट वरून यासंबंधीची पोस्ट केली आहे.

११६० हेक्टर जागेवर १६ हजार कोटी रूपये खर्च करून हे विमानतळ उभारलं जाणार आहे. याचे काम तीन टप्यात होणार असून पहिला टप्पा डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होणार असून पहिले विमान टेकऑफ होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. एकूण 6 कोटी प्रवाशांची ने-आण करण्याची क्षमता या विमानतळाची असेल.