Fri, Jul 19, 2019 17:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नालासोपार्‍याची ‘ती’ चिमुरडी मानसिक धक्क्यातून सावरतेय

नालासोपार्‍याची ‘ती’ चिमुरडी मानसिक धक्क्यातून सावरतेय

Published On: Apr 09 2018 4:12PM | Last Updated: Apr 09 2018 4:12PMमुंबई : प्रतिनिधी

एक्झाम चल रहे है. सहेलिया तो नही आ सकेगी. बस एक गुडिया ला दिजिये! नायर रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या नालासोपार्‍यातील त्या 12 वर्षीय चिमुरडीने केलेली ही मागणी ऐकणार्‍यांच्या काळजाला स्पर्श करून गेली. अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणार्‍या नराधमापासून सुटका करत स्वत:ची अब्रू वाचवण्यासाठी तिने तिसर्‍या मजल्यावरून खाली उडी घेतली होती. त्या घटनेने बसलेल्या मानसिक धक्क्यातून ती हळूहळू सावरतेय. पाचवीमध्ये शिकणार्‍या या मुलीने तिसर्‍या मजल्यावरून उडी घेतल्याने कमरेखाली फ्रॅक्चर झाले.

3 एप्रिलला रात्रीच तिच्यावर नायर रुग्णालयात अस्थिव्यंगोपचारतज्ञ डॉ. कुमार दुसा यांच्या नेतृत्वाखाली शस्त्रक्रिया करण्यात आली. शिवाय बालरोगतज्ञ, मानसोपचारतज्ञ आणि फॉरेन्सिक मेडिसिन तज्ञांकडून समुपदेशनही करण्यात आले. तिची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नुकतीच आमदार डॉ.निलम गोर्‍हे यांनी तिची भेट घेतली. तिला पूर्ण बेड रेस्टची गरज असल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.रमेश भरमल यांनी सांगितले.
Tags: girls, mental shock, belding,  jump