Wed, Feb 20, 2019 02:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत मुलीवर सामूहिक बलात्कार : दोघांना अटक

भिवंडीत मुलीवर सामूहिक बलात्कार : दोघांना अटक

Published On: Feb 09 2018 2:01AM | Last Updated: Feb 09 2018 1:14AMभिवंडी : वार्ताहर 

आई-वडिलांना घराबाहेर काढून जीवे ठार मारण्याची धमकी देत 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून तीन नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भिवंडीतील न्यू आझादनगर येथे बुधवारी रात्री घडली. या अमानुष बलात्कारप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. इंमु ऊर्फ इम्रान खान (24), जावेद शेख (23) व किन्ना अशी नराधमांची नावे आहेत. 

या तिघा नराधमांनी संगनमत करून पीडितेच्या घरात शिरून आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी त्यांना घराबाहेर काढून पीडितेला चाकूचा धाक दाखवून आळीपाळीने बलात्कार केला. यानंतर तिघेही फरार झाले. घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस ठाण्याचे एपीआय संतोष बोराटे यांनी पोलीस पथकासह सापळा लावून इम्रान आणि जावेद या दोघांना शिताफीने अटक केली.या दोघांना गुरुवारी ठाण्याच्या जिल्हा सत्र न्यायालयाने 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. 

दरम्यान, भादवड येथेही घरासमोर खेळणार्‍या 3 वर्षीय मुलीला शेजारच्या विष्णुकांत वर्मा (28) याने घरात बोलावून तिच्याशी अश्‍लील चाळे केले. याप्रकरणी पोलिसांनी त्याला गजाआड केले आहे.