Mon, Apr 22, 2019 15:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाचशे उठाबशा काढणाऱ्या विजयाला डिस्चार्ज (व्हिडिओ)

पाचशे उठाबशा काढणाऱ्या विजयाला डिस्चार्ज (व्हिडिओ)

Published On: Dec 20 2017 3:33PM | Last Updated: Dec 20 2017 4:28PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

शिक्षिकेने ५०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्यामुळे अत्यवस्थ झालेल्या विजया चौगुलेला केईएम रूग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला. विजया स्वत:च्या पायाने चालत रूग्णालयातून बाहेर पडली. इतक्या दिवसांनी घरी जायला मिळणार यामुळे विजयाच्या चेहऱ्यावर हास्य फूलले होते. 

कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यातील कानूर बुद्रूक येथील भावेश्वरी संदेश विद्यालयात आठवीत शिकणार्‍या विजयाला मुख्याध्यापिकेने ५०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्यानंतर तिची प्रकृती बिघडली होती. सुरुवातीला तिला कोल्हापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, नंतर कोल्हापूरहून मुंबईच्या केईएम रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. हा विषय हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये गाजला होता.