Fri, Aug 23, 2019 21:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चिमुकलीवर शाळेत लैंगिक अत्याचार

चिमुकलीवर शाळेत लैंगिक अत्याचार

Published On: Apr 24 2018 2:02AM | Last Updated: Apr 24 2018 1:00AMमुंबई : प्रतिनिधी

माझगावातील एका शाळेत शिकत असलेल्या अवघ्या साडेचार वर्षाच्या चिमुरडीवर शाळेतील सेविकेने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या सेविकेविरोधात गुन्हा दाखल करुन भायखळा पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत चिमुरडी माझगावातील एका शाळेत शिकत असून गेल्या आठवडभरापासून 59 वर्षीय सेविका तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होती. आपल्या पोटामध्ये प्रचंड दुखत असल्याचे या चिमुरडीने रविवारी आईला सांगितले. आईने तिला तपासणीसाठी रुग्णालयात नेले असता तिच्या गुप्त भागावर जखमा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर आईने विचारपूस केल्यानंत चिमुरडीने अत्याचारांना वाचा फोडली.

आरोपी सेविका चिमुरडीवर अत्याचार करत असल्याच समोर आल्याने शाळेत खळबळ उडाली. या प्रकरणानंतर 20 वर्षांपासून शाळेत असलेल्या या सेविकेला शालेय प्रशासनाने तात्काळ कामावरुन काढून टाकले. त्यानंतर पीडित कुटूंबियांनी भायखळा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. 

वाशीत अल्पवयीन मुलीशी चाळे

बेलापूर : वार्ताहर 

 जुहूगावात राहणार्‍या एका 14 वर्षीय मुलाने एका अल्पवयीन मुलीशी अश्‍लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.वाशी पोलिसांनी या अल्पवयीन मुलावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक तसेच विनयभंगानुसार गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

पीडित अल्पवयीन पाच वर्षीय मुलगी ही वाशीतील जुहुगावात राहणारी असून तिच्याशी अश्‍लील चाळे करणारा 14 वर्षीय मुलगाही जुहूगावात राहाण्यास आहे. या आठवड्यात पीडित मुलीचे कुटुंबीय घर बदली करत होते.त्यावेळी 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा हा त्यांना सामान हलवण्यासाठी मदत करत होता. यादरम्यान अल्पवयीन मुलाने त्या पीडित मुलीशी  अश्‍लील चाळे केले. हा प्रकार मुलीच्या मोठ्या बहिणीने पाहिला. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस केली असता तिने त्या 14 वर्षीय मुलाने चाळे केल्याचे सांगितले.

Tags : Mumbai,  girl sexual abuse issue, School, DP Tripati, Mumbai news,