Thu, Aug 22, 2019 10:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तरुणीवर केला प्रियकरानेच बलात्कार

तरुणीवर केला प्रियकरानेच बलात्कार

Published On: Aug 20 2018 1:49AM | Last Updated: Aug 20 2018 1:14AMडोंबिवली : वार्ताहर

21 वर्षीय तरुणीला प्रेमाच्या आणा- भाका देत, लग्नाचे आमिष दाखवत शरीर संबंधांची मागणी केली. मात्र पीडितेने नकार देताच संतापलेल्या प्रियकराने तिला बेदम मारहाण करीत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना डोंबवलीत उघडकीस आली आहे.  धिरेंद्र राजभर (30) असे नराधमाचे नाव आहे. 

कल्याण शीळ रोडवरील सोनारपाडा परिसरात पीडित तरुणी राहते. तर पिसवली येथील ओमसाई नगरमधील एका चाळीत आरोपी धिरेंद्र राहतो. पिडीत तरुणीशी 2013 मध्ये त्याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात होवून धिरेंद्रने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत शरीर संबंधाची मागणी केली. मात्र संबधास पीडित तरुणीने नकार देताच तिला शिवीगाळ व बेदम मारहाण करत तिच्यावर तो राहत असलेल्या घरातच बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतरही त्याने सतत पाच वर्षे लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार करून लग्नास नकार दिला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे पिडीत तरुणीला समजताच तिने मानापाडा पोलीस  ठाण्यात धाव घेवून  धिरेंद्र विरोधात मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार मानपाडा पोलीस ठाण्यात धिरेंद्र राजभर विरोधात बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरु आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भोईर करीत आहेत.