Thu, Jul 18, 2019 02:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोटच्या पोरीवर अतिप्रसंग करणार्‍या आई-वडिलांना न्यायालयीन कोठडी

पोटच्या पोरीवर अतिप्रसंग करणार्‍या आई-वडिलांना न्यायालयीन कोठडी

Published On: Dec 07 2017 2:06AM | Last Updated: Dec 07 2017 1:32AM

बुकमार्क करा

विरार : वार्ताहर

आपल्याच मुलीवर सातत्याने बलात्कार करणार्‍या आणि त्यासाठी त्याला सहकार्य करणार्‍या नराधम दाम्पत्याला वसई न्यायालयाने आज न्यायालयीन कोठडी सुनावली. 

याबाबत अधिक वृत्त असे, वसई येथील 24 वर्षीय युवतीवर तिचे वडील गेल्या अनेक वर्षांपासून बलात्कार करत होते. त्यासाठी त्याची पत्नी म्हणजेच मुलीची आई त्याला सहकार्य करत होती. चारवेळा तिने मुलीला खाजगी रुग्णालयात नेवून तिचा गर्भपात केला. लोकांना दाखवण्यासाठी त्यांनी मुलीचे लग्न लावून दिले. नंतर विविध कारणांनी तो मुलीला घरी बोलवायचा आणि तिच्यावर अतिप्रसंग करायचा. एके दिवशी तिच्या पतीला हा प्रकार कळला तेव्हा युवतीच्या वडिलांनी त्याच्याशी भांडण करून मुलीचा घटस्फोट मागितला आणि अडीच लाख  रुपयांची मागणी केली. त्याने तेवढी रक्कम देवून घटस्फोट घेतला.

काही काळानंतर त्याने पुन्हा मुलीचे दुसरे लग्न लावून दिले. दुसरा पती भिवंडी येथे राहणारा असल्याने आता नराधम बापाच्या तावडीतून सुटका झाली या विचाराने ती आनंदी झाली. मात्र तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही. बाप भिवंडी येथेही पोहोचला आणि वसईत आपल्याच घराजवळ राहायला यावे यासाठी आग्रह केला. सुरुवातीला जावयाने नकार दिला तेव्हा त्याच्याशी जोरदार भांडण केले आणि अखेर त्याला वसईत यायला भाग पाडले. एक दिवस जावई कामानिमित्त बाहेर गेल्याने बघून बाप त्याच्या घरी धडकला आणि मुलीवर जबरदस्ती करू लागला. तेवढ्यात तिचा पती आला तेव्हा तिने सर्व हकीकत त्याला सांगितली. त्याने तिला आधार दिला आणि पोलिसांत तक्रार करण्यासाठी सहकार्य केले. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या आईला अटक केली. पत्नी अटक झाल्याचे कळताच बापाने पळ काढला. पण पोलिसांनी त्याला मुंबईतून अटक केली.

या दोघांची पोलीस कोठडी आज संपताच त्यांना वसई न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.