Wed, Nov 21, 2018 14:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नालासोपार्‍यातील ‘त्या’ मुलीची हत्या वडिलांच्या प्रेयसीकडूनच

नालासोपार्‍यातील ‘त्या’ मुलीची हत्या वडिलांच्या प्रेयसीकडूनच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नालासोपारा : वार्ताहर

नालासोपारा पूर्वेत राहणार्‍या अंजली सरोज (6) या मुलीची हत्या तिच्या वडिलांच्या प्रेयसीनेच केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. अनिता वाघेला असे तिचे नाव असून, तिला तुळींज पोलिसांनी अटक केली. अंजलीचे वडील संतोष हे अनिताशी लग्न करण्यास तयार नसल्याने सूड म्हणून तिने ही हत्या केल्याचे तपासात निष्पण्ण झाले आहे. 

अंजली सरोज या मुलीचे गेल्या आठवड्यात 24 मार्च रोजी अपहरण झाले होते. तिचा मृतदेह दुसर्‍या दिवशी गुजरातच्या नवसारी रेल्वे स्थानकातील महिलांच्या प्रसाधनगृहात सापडला होता. 

संतोष आणि आरोपी अनिता यांचे गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्याने अनिताला लग्नाचे आमिष दाखवले, परंतु तो लग्न करण्यास टाळाटाळ करत असल्याने त्याला धडा शिकवण्यासाठी तिने ही हत्या केली असल्याचे उघड झाले आहे. 

Tags : mumbai news,girl murdered, fathers girlfriend,


  •