Sat, Mar 23, 2019 18:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : बालिकेचे अपहरण करून गुजरातमध्ये हत्या

ठाणे : बालिकेचे अपहरण करून गुजरातमध्ये हत्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नालासोपारा : रुतिका वेंगुर्लेकर

नालासोपारा पूर्वेकडील विजय नगर येथे राहणाऱ्या एका बालिकेचे एका महिलेने शनिवारी ((दि. २४ मार्च) अपहरण केल्याची घटना घडली होती. या बालिकेचे रविवारी (दि. २५ मार्च) ला गुजरात मधील नवसारी रेल्वे स्टेशनच्या महिला शौचालयात धारधार शस्त्राने गळा कापून हत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

मात्र, पोलिसांच्या हलगर्जीपणाचा आरोप करीत सोमवारी (दि. 26 मार्च) संध्याकाळी संतप्त झालेल्या नातेवाईकांनी पोलीसाविरोधात घोषणाबाजी केली. तर नालासोपारा पोलिस ठाण्यास घेराव घालत काही वेळ रस्ता रोको केला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, नालासोपारा पूर्वेकडील विजय नगर येथे राहणारी अंजली संतोष सरोज हि बालिका आपल्या घराच्या बाहेर खेळत होती. याचवेळीस याबालिकेस एका महिलेने कशाचे तरी अमिष दाखवून तिचे अपहरण केले. यासर्व घटनेचे सीसीटीव्ही फुटेज बाजूलाच असणाऱ्या लोकमान्य शाळेच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाले होते. यासंबंधीची तक्रार मुलीचे आजोबा हरिश्चंद्र सरोज यांनी तुळींज पोलीस ठाण्यात दिली. मात्र पोलिसांनी यासंबंधी तत्काळ दखल घेतली नाही. तर रविवारी (दि. २५ मार्च) ला गुजरात मधील नवसारी रेल्वे स्टेशनच्या महिला शौचालयात धारधार शस्त्राने गळा कापून अंजलीची हत्या झाल्याचे समोर आले. याघटनेमुळे अंजलीच्या घरच्यानी पोलिसांनी यासंबंधी तात्काळ तक्रार घेतली नाही, आणि तपास केला नाही नाहीतर आपली मुलगी जिवंत सापडली असती असा आरोप केला आहे.

दरम्यान पोलीस उपअधीक्षक जयंत बजबळे यांनी सांगितले की शनिवारी रात्री अकरा वाजता बेपत्ता झाल्याची तक्रार तुळींज पोलीस ठाण्यात आली होती. त्यानंतर रात्री दोन वाजता अपहरणाचा गुन्हा दाखल करून रविवारी सकाळी चार पथके रवाना करण्यात आली होती. त्या परिसरातील पाच ते सहा ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत असताना त्यात असे दिसून आले की एक महिला मुल खेळत असताना तिथे आली आणि तिने सर्वांना खाऊ दिले होते.त्यानंतर अंजलीला घेवून महिला तिथून पसार झाली.रविवारी संध्याकाळच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की नवसारी रेल्वे स्टेशनच्या महिला प्रसाधनगृहात एक मृतदेह सापडला .त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता.तो मृतदेह अंजलीचा असल्याचे उघड आले.याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

 

Tags : Thane, nalasopala crime, girl kidnap, murder, Gujarat,


  •