Sun, Mar 24, 2019 06:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणमधील तरुणीला राजस्थानात विकले

कल्याणमधील तरुणीला राजस्थानात विकले

Published On: Feb 09 2018 4:56PM | Last Updated: Feb 09 2018 4:56PMकल्याण : प्रतिनिधी

मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेला व तिच्या मुलीला  रोजगाराचे आमिष दाखवत, कल्याण मधून राजस्थानात नेत दीड लाख रूपयांना विकल्‍याची धक्‍कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महात्मां फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून, या तक्रारीनुसार पोलिसांनी माला शर्मा तिचा पती विष्णू शर्मा ,मनोहर शर्मा ,व रामेश्वर या चार जनांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सदर पीडित महिला ही मुळची जालना येथील रहिवासी असून, ती कल्याण मध्ये मोलमजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. गेल्‍या वर्षी या या महिलेच्या ओळखीतले माला शर्मा तिचा पती विष्णू शर्मा, मनोहर शर्मा, या तीघांनी तिला व तिच्या मुलीला राजस्थान येथे रोजगार मिळवून देतो असे आमिष दाखवले. व त्‍यासाठी  तिला व तिच्या मुलीला राजस्थान येथील  प्रतापगड बरोटा येथे घेवून गेले होते. या ठिकाणी या महिलेला तुझ्या मुलीला काम लागले आहे. तेव्हा तू परत जा असे सांगीतले. त्यामुळे ही महिला पुन्हा घराकडे कल्याणला परतली होती. महिनाभराचा कालावधी उलटून गेल्‍यानंतरही मुलगी घराकडे न परतल्याने आईने संबधीत या तिघांकडे विचारणा केली. यावर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर तिने दोन तीनदा राजस्थान गाठत या तिघांना मुलीला परत पाठवा अशी विनवणी केली. याच दरम्यान या तिघांनी रामेश्वर नावाच्या इसमाला तीच्या मुलीला तब्बल दीड लाखांना विकल्‍याची माहिती दिली. तसेच या  या व्यक्‍तीने तुझ्या मुलीला डांबून ठेवल्‍याचेही सांगितले समजताच आईला धक्काच बसला. त्यानंतर वारंवार विनंती करूनही मुलगी परत न मिळाल्याने अखेर हताश झालेल्या महिलेने काल उशिराने या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी माला शर्मा तिचा पती विष्णू शर्मा ,मनोहर शर्मा व रामेश्वर या चार जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात केला आहे. तसेच या  प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे .