Sat, Feb 16, 2019 16:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे: गिरिराज हाईट्सच्या २५ व्या मजल्याला आग (व्हिडिओ)

ठाणे: गिरिराज हाईट्सच्या २५ व्या मजल्याला आग (व्हिडिओ)

Published On: Jan 19 2018 3:58PM | Last Updated: Jan 19 2018 3:59PMठाणे : पुढारी ऑनलाईन  

स्व. वसंत डावखरे यांच्या गिरिरीज हाईट्स इमारतीच्या २५ व्या मजल्याला आज दुपारी आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीच्या ठिकाणाहून १५० लोकांना सुरक्षितस्थळी बाहेर काढण्यात आले. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

गिरीराज हाईट्समध्ये २५ व्या मजल्याला लागलेली आग २६ व्या मजल्यापर्यंत पोहोचली. या दोन्ही मजल्यावर साधारण १५० लोक अडकले होते. त्यांना इमारतीच्या टेरेसवर हलवण्यात आले. स्व.सवंत डावखरे यांचे घर २५ व्या मजल्यावर होते.  आग लागली तेव्हा त्यांच्या घरी कुटुंबिय आणि काही नातेवाईक उपस्थित होते.