होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घोडबंदर रोडवर ऑईल टँकरचा अपघात

घोडबंदर रोडवर ऑईल टँकरचा अपघात

Published On: Mar 22 2018 9:49AM | Last Updated: Mar 22 2018 9:50AMठाणे : प्रतिनिधी

ठाण्यातील पातलीपडा पूल, घोडबंदर रोड, येथे ऑईलने  भरलेला कंटेनरचा अपघात झाल्यामुळे रस्त्यावर ऑईल पडले आहे.  घटनास्थळी पोलिस, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दल, आयआरबीचे कर्मचारी, दोन जेसीबी, दोन मातीचे डंपर दाखल झाले आहेत. ड्रायव्हर जितलाल पल हा जखमी झाला असून त्याला जवळील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी रस्त्यावर माती टकण्याचे काम सुरू केले आहे. 

Tags : ghodbandar, road, oil tanker, accident, injured driver, pudhari accident news,