Sat, Apr 20, 2019 09:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : उल्हासनगरमध्ये गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ११ जण गंभीर 

ठाणे : गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ११ गंभीर 

Published On: Feb 16 2018 9:49AM | Last Updated: Feb 16 2018 9:49AMउल्हासनगर : प्रतिनिधी

उल्हासनगर कॅम्प नंबर १ शहरातील शहाड परिसरात रात्री उशिरा सेंच्युरी रेयॉन कंपनीत विषारी गॅस गळतीमुळे संजय शर्मा या कामगाराचा जागीच गुदमरून मृत्यू झाला. या दुर्घटनेत ११ कामगारांच्या शरीरात विषारी गॅस गेल्याने त्यांना गंभीर आवस्थेत कल्याणच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कंपनीत रात्री गॅस पाईपलाईनच्या दुरूस्तीचे काम सुरु होते. त्याच सुमाराला एका गॅसच्या पाईपलाईनमधून अचानक विषारी गॅसची गळती सुरु झाली.त्यामध्ये संजयचा गुदमरून मृत्यू झाला तर इतर कामगारांना त्याची बाधा झाली. संजयच्या मृत्यूमुळे कंपनी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. महत्वाची बाब म्हणजे कंपनीच्या आणि ठेकेदाराच्याकडून कामगारांना सूरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही सुविधा, साहित्य पुरविण्यात आली नसल्याने ही दुर्घटना झाल्याचा आरोप कामगारांच्या नातेवाईकांनी केला आहे. यापूर्वी देखील या कंपनीत अनेकदा अशा दुर्घटना घडल्या आहेत. तरीही कंपनी प्रशासना कामगारांच्या सुरक्षेसंबंधी गंभीर नसल्याचे या दुर्घटनेवरून समोर आले आहे.