Fri, May 29, 2020 16:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दगाबाज मित्राने केली विवाहितेवर बळजबरी

दगाबाज मित्राने केली विवाहितेवर बळजबरी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

 डोंबिवली : वार्ताहर

मित्र जेलमध्ये असल्याची संधी साधून त्याच्या पत्नीवर घरात घुसून मित्रानेच जीवे ठार मारण्याची धमकी देत बळजबरी केल्याची धक्कादायक घटना कल्याणात उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे तर या नराधम मित्राने पतीला जेलमधून निर्दोष मुक्त करण्याचे आमिष दाखवत पीडित विवाहितेकडून 5 लाख रुपये उकळल्याचेही समोर आले आहे. सूर्यकांत शिंदे (रा.अंबरनाथ) असे या नराधमाचे नाव असून पीडितेच्या तक्रारीनुसार खडकपाडा पोलीस ठाण्यात बलात्कारासह व जीवे ठार मारण्याची धमकी व आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूर्यकांत हा एका शाळेचा संचालक असल्याची माहितीही समोर आली आहे.

कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 42 वर्षीय विवाहिता राहते. या पीडितेचा पती सध्या एका गुन्ह्यात जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. त्यामुळे ती एकटीच राहते. तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत पतीचा मित्र सूर्यकांत 26 सप्टेंबर रोजी रात्री पीडितेच्या घरात घुसला. त्यानंतर जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरी केली. तुझ्या पतीला केसमधून निर्दोष मुक्त करतो, असे आमिष दाखवत या महिलेकडून 5 लाख रुपये उकळल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. आरोपी सूर्यकांत शिंदे हा फरार असून पोलीस उपनिरीक्षक एस. एफ. कदम व त्यांचे पथक त्याचा शोध घेत आहेत.