Wed, Sep 19, 2018 22:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वसईत मित्राकडून गोळी घालून मित्राची हत्‍या 

वसईत मित्राकडून गोळी घालून मित्राची हत्‍या 

Published On: Feb 05 2018 5:42PM | Last Updated: Feb 05 2018 5:42PMठाणे : प्रतिनिधी

वसईतील कामण गावात ऐका मित्राने दुसऱ्या मित्राची गोळी घालून हत्या केली आहे. बबन माळी असे हत्‍या झालेल्‍याचे नाव आहे. तर, महेंद्र ठाकूर असे हत्‍या करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. 
बबन माळी हे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असून त्‍यांच्या नावावर अनेक जमिनी आहेत. गेल्या दोन वर्षांपासून दोघांमध्ये जमिनीच्या व्यवहारावरून वाद सुरु होता. सोमवारी सकाळी दोघांमध्ये जमिनीच्या व्यववाहरावरून झटापट झाली. यावेळी महेंद्र ठाकूरने बबनवर गोळी झाडली. यात बबन याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने महेंद्र ठाकूर यांच्या घराची व गाडीची तोडफोड करून जाळपोळ करत रास्तारोको केला. 

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वालीव पोलिसांनी घटनास्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. खबरदारी म्‍हणून एसआरपी आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. वालीव पोलिसांनी ठाकूर यांच्या कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. याप्रकरणी ९ जणां विरोधात गुन्हा दाखल केला असून, 3 जणांना ताब्यात घेतले आहे. मुख्य संशयित आरोपी महेंद्र ठाकूर फरार आहे.