Wed, Apr 24, 2019 12:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण:विद्यार्थ्यांची भांडण लावणार्‍यांवर कारवाई होणार का ?(Video)

कल्याण:विद्यार्थ्यांची भांडण लावणार्‍यांवर कारवाई होणार का ? (Video)

Published On: May 05 2018 12:51AM | Last Updated: May 04 2018 10:47PMकल्याण: वार्ताहर 

मोबाईल टीव्ही वरील फ्री स्टाईल मारामारी पाहून आनंद घेण्याचा कल विद्यार्थी वर्गात वाढला आहे. असाच प्रकार कल्याण खडकपाडा येथील मोहन प्राईड इमारती नजीक एका खासगी क्लास सुटल्यावर क्लासच्या विद्यार्थ्यांची काही टवाळ तरुणांनी भांडण लावून दिले. त्यांच्या फ्री स्टाईल हाणामारी सुरु झाली. तेव्हा या भांडणाचा मनमुरात आनंद घेत बघ्यांनी चक्क मोबाईल व्हीडीओ तयार केला. हा व्हिडीओ त्यांनी सोशल मिडिया व व्हॉटसअपवर व्हायरल केला. 

सदरचा प्रकार उच्चभू लोकवस्ती नजीक घडली असून एका  खासगी क्लासमध्ये शिकणारी ही मुले नामांकित शाळेतील आहे. त्यांच्या भांडण लावून त्यांची मनमुराद आनंद  घेणाऱ्या टवाळखोर तरुणांनी यापूर्वी अशा प्रकारे तीन वेळा क्लासच्या विद्यार्थ्यांना आपापसात जुंपवून दिले आहे. एकीकडे मारामारी होत असताना भांडण लावून देणारे तरुण चक्क हसून हसून त्याची मज्जा घेत होते. अशा प्रकारे जीवघेण्या हाणामारीत एखाद्या विद्यार्थ्याचा मृत्यू होऊ शकतो. याच्याशी मन मुराद आनंद व मज्जा घेणाऱ्यायचे काही एक देणेघेणे नाही. अशा प्रकारे एखाद्या विद्यार्थ्याचा जीव गेल्यास ही मज्जा जीवावर बेतू शकते. या प्रकारामुळे अनेक सवाल उपस्‍थित होत आहेत. 

वर्षभरापूर्वी डोंबिवलीती एका मैदानात शाळकरी मुलाची हत्या शाळकरी अल्पवयीन मुलांनीच केली होती. क्रिकेट खेळण्याच्या वादातून ही घटना घडली होती.ही अघोरी विकृती निर्माण झाल्याने पालक वर्गातून संतप्‍त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याच्यावर शाळा, खाजगी क्लास काही आळा घालणार आहे की नाही. पोलिस या व्हीडीओची दखल घेऊन भांडण लावून देणारे त्याचा व्हीडीओ करुन त्यात मज्जा लुटणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेईल का असा खरा प्रश्न आहे.