Wed, Apr 24, 2019 07:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भविष्य निर्वाह निधीच्या सुमारे 2 कोटी रकमेचा अपहार

भविष्य निर्वाह निधीच्या सुमारे 2 कोटी रकमेचा अपहार

Published On: Jul 15 2018 1:55AM | Last Updated: Jul 15 2018 1:46AMमुंबई : प्रतिनिधी

कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या तब्बल 1 कोटी 94 लाख रुपये रकमेचा अपहार केल्याप्रकरणी एका खाजगी कंपनीच्या तत्कालीन सीईओ विरोधात ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या एका कर्मचार्‍याने दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला असून अवघ्या चार महिन्यात एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दादरच्या सेनापती बापट मार्गावरील सनशाईन टॉवर इमारतीच्या 23 व्या मजल्यावर झिकिट्झा हेल्थकेअर प्रा. लि. कंपनीचे कार्यालय आहे. 

गेल्यावर्षीच्या जुलै महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत कंपनीतील कर्मचार्‍यांच्या मासिक वेतनातून भविष्य निर्वाह निधीच्या नावाखाली रक्कम कपात करण्यात आली. मात्र ही रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमाच करण्यात आली नाही. हा धक्कादायक प्रकार समोर येताच कर्मचार्‍यांनी याबाबत वरिष्ठांकडे विचारणा करण्यास सुरुवात केली. कर्मचार्‍यांनी अनेक तक्रारी करत पाठपुरावा सुरु ठेवल्यानंतर कंपनीचे तत्कालीन सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक नरेश धनराज जैन यांनी हा अपहार केल्याचे उघड झाले.