Sat, Mar 23, 2019 16:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माजी नौदलप्रमुख अॅडमिरल जयंत नाडकर्णी यांचे निधन

माजी नौदलप्रमुख अॅडमिरल जयंत नाडकर्णी यांचे निधन

Published On: Jul 03 2018 2:16AM | Last Updated: Jul 03 2018 2:16AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

माजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल (निवृत्त) जयंत गणपत नाडकर्णी (वय ८६) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मुंबई येथील नौदलाच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

गेल्या दीड महिन्यांपासून नाडकर्णी आजारी होते. उपचारासाठी त्यांना मुंबई येथील नौदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती उपचारांना प्रतिसाद देत नव्हती. अखेर सोमवारी दुपारी ४ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. नाडकर्णी यांच्या पार्थिवावर मंगळवारी (३ जुलै) पुण्यातील मुक्तिधाम स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नाडकर्णी यांनी डिसेंबर १९८७ ते नोव्हेंबर १९९० पर्यंत नौदलप्रमुख म्हणून धुरा सांभाळली. निवृत्तीनंतर ते पुण्यात वास्तव्याला होते. मेरिटाइम हिस्ट्री सोसायटीचे ते संस्थापक सदस्य होते. जयंत नाडकर्णी यांच्या पत्नी विमल नाडकर्णी यांचे २०१६ मध्ये निधन झाले.