Sat, Jul 20, 2019 23:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी : शरद पवार 

शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी : शरद पवार 

Published On: Jun 04 2018 12:55PM | Last Updated: Jun 04 2018 1:04PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

देशभरातील शेतकऱ्यांनी सरकारने हमीभाव द्यावा, संपूर्ण कर्जमाफी करावी तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात यासाठी १ जून पासून दहा दिवस संप पूकारला आहे. या संपाचा आज चौथा दिवस आहे. या संपाबाबत कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांनी हे प्रसिध्दीसाठी सुरु आहे असे वादग्रस्त विधान केले होते. तर आज या संपला माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. 

शरद पवार यांनी सलग चार दिवस सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाला पांठिंबा देत शेतकऱ्यांनी आता टोकाची भूमिका घ्यावी असे वक्तव्य केले आहे. पवार म्हणाले ‘गेले चार दिवस सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाला एक शेतकरी म्हणून माझा पाठिंबा आहे. या सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत. शेतकऱ्यांनी आता टोकाची भूमिका घ्यावी.’ पवार पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी शक्यतो शेतीमाल आणि दूध रस्त्यावर न ओतता ते गरिबांना द्यावे त्यामुळे त्यांची सहानभुती मिळेल.

पवारांनी पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या साम दाम दंडाच्या वक्तव्यावर टीका केली. ते म्हणाले ‘मी सत्तेत असताना कधीही सत्तेचा गैरवापर केला नाही. पण, मुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदाचा वापर केला.’ 

 

Tags : sharad pawar, former agriculture minister, farmer strike, farmer should take extreme step