Thu, Apr 25, 2019 04:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › श्रीदेवींच्या मृत्यूचा नवा खुलासा; हार्टअटॅक नव्हे..

श्रीदेवींच्या मृत्यूचा नवा खुलासा; हार्टअटॅक नव्हे..

Published On: Feb 26 2018 4:06PM | Last Updated: Feb 26 2018 5:14PMदुबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडची चांदनी अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू हृदयविकाराने नाही तर चक्कर येऊन बाथटबमध्ये बुडून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. श्रीदेवी यांच्या डेथ सर्टीफिकेवर अपघाती मृत्यू असे म्हटले आहे. श्रीदेवी यांच्या रक्तात दारूचा अंश आढळला असल्याचेही शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. 

दुबईतील एका हॉटेलमध्ये श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री निधन झाले होते. सुरुवातीला कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. यानंतर हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाले असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण, आता अधिकृत आलेल्या शवविच्छेदन अहवालात दारूच्या नशेत चक्कर येऊन त्यांचा तोल गेल्याने बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे युएईच्या गल्फ न्यूजने दिली आहे. 

ब्लॉग : हा ‘सदमा’ कसा सहन करायचा?  

‘पवन हंस’ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

श्रीदेवी यांचे पार्थिव आज मुंबईत येण्याची शक्यता असल्याने त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली आहे. आज रात्री उशीरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. मुंबईतील विले-पार्लेमधील पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याठिकाणी फॉगिंग मशीन वापरण्यात आले असून स्वच्छताही करण्यात आली आहे. ­­­­­­­

पार्थिव आणायला का लागतोय वेळ

श्रीदेवी यांचे निधन होऊन दिड दिवस उलटला तरी त्यांचे पार्थिव अद्याप भारतात आणलेले नाही. सूत्रांच्या माहितीनूसार, दुबईमध्ये रूग्णालयाच्या बाहेर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर त्याचा संपूर्ण तपास करण्यासाठी २४ तासांचा वेळ लागतो. श्रीदेवींच्या केसमध्येही पोलिसांनी हा प्रोटोकॉल पाळला आहे. 

श्रीदेवी: अशी होती लाईफ स्टाईल, इतके घ्यायच्या मानधन 

उद्योगपती अनिल अंबानी यांनी पाठवले विमान

श्रीदेवी यांचे पार्थिव लवकरात लवकर भारतात यावे यासाठी रिलायंस ट्रांसपोर्ट ॲण्ट ट्रॅव्हल लिमिटेडचे एम्ब्राएर-१३५ बीजे हे १३ आसनी विमान दुबईला पाठवले आहे.

अनिल कपूर यांच्या घरी कलाकरांची हजेरी

सर्वांच्याच डोळ्यात आश्रू देऊन जगाचा निरोप घेतलेल्या श्रीदेवी यांना निरोप देण्यासाठी चित्रपटसृष्टीतील अनेक सितारे त्यांच्या घरी हजेरी लावत आहेत. अभिनेता अनिल कपूर यांच्या घरी सर्व कलाकार जमले आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा, माधूरी दिक्षीत, अर्जुन कपूर, अनुपम खेर या कलाकारांनी हजेरी लावली आहे. 

श्रीदेवीनं पोटधरून हसवलं आणि तितकच रडवलं...

श्रीदेवी यांचा शवविच्छेदन अहवाल