Sat, Mar 23, 2019 16:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पनवेल आयुक्‍तांच्या बदलीसाठी महापौर दालन बंद

पनवेल आयुक्‍तांच्या बदलीसाठी महापौर दालन बंद

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

प्रतिनिधी : विक्रम बाबर  

पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यावर भाजप सत्ताधारी पक्षांनी अविश्वास ठराव मंजूर केल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी महापौर, उप महापौर तसेच सभापतींनी आज आपली दालने बंद करून, जो पर्यंत आयुक्त सुधाकर शिंदे यांची बदली होणार नाही तो पर्यंत महापौर, उप महापौर आणि सभापती दालनात बसून काम करणार नसल्याचा निर्धार भाजप सत्ताधारी पक्षाच्या महापौर, उप महापौर तसेच सभापती यांनी केला. तसेचं कामकाज करणार नसल्याची माहिती दालनावर लावून आयुक्त हटावचा लढा तिव्र केल्याचे दिसून येत आहे.

पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त कामचुकार, अज्ञानी, खोटारडे आणि हेकेखोर असल्याचा गाजावाजा करत, आयुक्त यांच्या विरोधात सोमवारी आयोजित करण्यात आललेल्या विशेष बैठकीत भाजप सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी 50 विरुद्ध 22 मतांनी आयुक्तां विरोधातील "अविश्वास ठराव " मंजूर करून घेतला. यावेळी आयुक्त हटाव चा नारा देण्यात आला. सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत सत्ताधारी भाजप पक्षांने आयुक्तांच्या कारभारा विरोधात नाराजी व्यक्त करत आपला रोष व्यक्त केला. आयुक्त हे हेकेखोर असून, आपल्या मनाला वाटेल त्या पद्धतीने कारभार चालवत असल्याची माहिती भाजप नगरसेवकांनी सभागृहाला दिली. सोमवारी हा अविश्वास ठराव सभागृहात मंजूर झाल्यानंतर आयुक्त सुधाकर शिंदे हटाव चा लढा तिव्र करत आज मंगळवारी महापालिकेच्या महापौर,उप महापौर आणि सभापतींनी आपली दालने बंद करून आयुक्तांची बदली होणार नाही तोपर्यंत ही दालने बंद राहणार अशी घोषणा भाजप सभापतींनी दिली. सभापतींच्या या निर्णयामुळे आयुक्तांच्या विरोधातील वातावरण आज तापल्याचे दिसून येत आहे.


  •