Tue, Feb 19, 2019 20:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पिंपरी : सिलिंडर गॅसचा स्फोटात चार जण जखमी

पिंपरी : सिलिंडर गॅसचा स्फोटात चार जण जखमी

Published On: Jun 15 2018 11:33AM | Last Updated: Jun 15 2018 11:33AMपिंपरी : प्रतिनिधी

नेहरुनगर येथे गॅस सिलिंडरच्या स्‍फोटात चार जण जखमी झाले आहेत. दुर्गेश सिंग (वय 12), शिवा सिंग (वय 10), संदीप सिंग (वय 21), लबला देवी सिंग (वय 32) अशी या स्‍फोटात जखमी झालेल्‍यांच नावे आहेत. शुक्रवारी (दि. 15) सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. 

अग्निशामन दलाचा बंब घटनास्थळी पोचण्यापूर्वीच स्थानिकांनी आग विझवली. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींवर वायसीएम रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.