मुंबई विद्यापीठात पहिली तृतीयपंथी झाली पदवीधर; आयडॉलमधून शिक्षण

Last Updated: Oct 11 2019 1:49AM
Responsive image

Responsive image

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागात अधिकृत तृतीयपंथी म्हणून प्रवेश घेतलेल्या संतोष लोंढे यांनी बीएची पदवी पूर्ण केली आहे. तृतीथपंथी म्हणून नोंद करुन आयडॉलमध्ये शिक्षण पूर्ण झालेला पहिला विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी तिने इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीत एमए साठी प्रवेश घेतला आहे.

श्रीदेवी नावाने स्वतःला ओळखणार्‍या 35 वर्षीय संतोष लोंढे यांनी चार वर्षांपूर्वी बीए (मानसशास्त्र) साठी प्रवेश घेतला होता. या पदवी अभ्यासक्रमांचा नुकताच निकाल जाहीर झाला असून ते उतीर्ण झाले आहे. शिक्षणाशिवाय काही करता येणार नाही असे विचार पुढे आणत त्यांनी प्रवेश घेतला समाजासाठी काहीतरी वेगळे करावे असे नेहमी वाटत होते या जिद्दीने शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला ती एका स्वयंसेवी संस्थेत वंचित मुलांना शिकवताना एका इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत सर्किट डिझायनर म्हणून काम करतात. त्या मेक-अप कलाकार, भरतनाट्यम नर्तक आणि अभिनेत्री देखील आहे. 

2015 साली मुंबई विद्यापीठातील आयडॉल मध्ये स्वत: प्रवेशाची नावनोंदणी करताना श्रीदेवीने  महिला किंवा पुरुष पर्याय निवडण्याऐवजी तृतीयपंथी म्हणून अर्जात नोंद केली. विद्यापीठाने  पुरुष किंवा महिला पर्यांयांव्यतिरिक्त स्वतंत्र तृतीयपंथ पर्याय देण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मला नोंद करण्यास सूचना दिली. तशी मी मी अर्जात नोंद केल्याचे श्रीदेवी सांगते. त्यामुळे मी अधिकृत नोंदणी केलेली पहिली पदवीधर ठरली आहे.

मी प्रवेश घेण्यापूर्वी मी इंटिरियर डिझायनर म्हणून काम करत होती. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी माझी धडपड होती. आई आणि मित्रांच्या मदतीने लहान कॉस्मेटिकसचे दुकान सुरु केले. तेही परवडत नसल्याने मी दुकान बंद केले नंतर समाजकार्य क्षेत्रात नोकरी मिळाली व ती लैंगिक समस्यांबाबत जागरूकता आणि प्रश्न यासंदर्भात मी कार्य करते. किन्नर घटकाला आजही समाजात फारसे स्थान नाही.  सततचे टोमणे आणि समाजाचा छळदेखील सहन करावा लागला. सर्व वेदना सहन करीत मी हे सगळे सहन केले आणि शिक्षणाचा प्रवास सुरुच ठेवला यात यश मिळत आहे.  मेक-अप आर्टिस्ट म्हणून प्रशिक्षण, ब्युटीशियन म्हणून कामाची सुरुवात केली. भरतनाट्यम नृत्यातही पैसे कमविले असेही सांगते. तृतीयपंथासाठी कायदे आहेत कल्याणासाठी धोरण तयार केले पाहिजे असे ती म्हणते.

फरार विजय मल्ल्याचे इंग्लंडकडून भारताला प्रत्यार्पण


मुंबईत राजकीय वादळ; वंचितच्या 'या' दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश


कोल्हापूर : नवे १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले; रुग्ण संख्या ६४२ वर


निसर्ग चक्रीवादळाने पेणला झोडपले


पुणे : दहा लाखांच्या खंडणीसाठी डॉक्टरचे अपहरण, गुन्ह्याची मुख्य सुत्रधार बारामतीची महिला


जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, एका दिवसात ७१ पॉझिटिव्ह 


शिवराज्याभिषेकासाठीचे पवित्र जल संभाजीराजे यांच्याकडे सुपूर्द


शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने घेतले 'हे' महत्वाचे निर्णय! 


रायगड : रोह्यात चक्रीवादळाने हाहाकार


चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी