Thu, Jun 04, 2020 06:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पनवेलमध्ये कोरोनाचा पहिला बळी

पनवेलमध्ये कोरोनाचा पहिला बळी

Last Updated: Apr 10 2020 9:44AM

संग्रहित छायाचित्रपनवेल : पुढारी वृत्तसेवा 

खारघरमधील कोरोनाची लागण झालेल्या रहिवाशाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार आज (ता.१०) समोर आला. हा रहिवाशी खारघरमधील आहे. 4 दिवसांपूर्वी या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. या प्रकारामुळे पनवेलमध्ये खळबळ माजली आहे.

पनवेल महानगरपालिका हद्दीत ही वसाहत येते. या हद्दीत १६ कोरोना रुग्ण आहे. त्यापैकी ४ रुग्ण हे खारघरमधील आहेत. मृत रिक्षा चालक होता. कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर त्याच्या घरातील सदस्यांना देखरेखेखाली रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. काल रात्री ही घटना घडली.