Wed, Apr 24, 2019 21:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : मालाडमध्ये मिठाईच्या दुकानाला आग

मुंबई : मालाडमध्ये मिठाईच्या दुकानाला आग

Published On: May 29 2018 9:08AM | Last Updated: May 29 2018 10:00AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मालाड पश्चिम रेल्वे स्टेशनबाहेर गुप्ता मार्केटमध्ये एम. एम. मिठाईवाला यांचे दुकान आहे. या दुकानाला आज (मंगळवारी) सकाळी सात वाजताच्या सुमारास आग लागली. आगीत तीन ते चार दुकानंही जळून खाक झाली आहेत.

अग्निशमन दलाचे आठ फायर स्टेशन आणि सहा वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मार्केट परिसर असल्यामुळे या भागात नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. एम.एम. मिठाईवाला दुकानाला लागलेल्या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे कारणही अद्याप समजू शकलेले नाही.