Mon, Apr 22, 2019 03:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दिवा डम्पिंग परिसरात विषारी केमिकलच्या गोणीला आग

दिवा डम्पिंग परिसरात विषारी केमिकलच्या गोणीला आग

Published On: Jun 25 2018 2:58PM | Last Updated: Jun 25 2018 2:58PMठाणे : अमोल कदम

दिवा डम्पिंग ग्राऊंड येथे पुन्हा एकदा विषारी केमिकलच्या गोण्यांना आग लागली आहे. या आगीच्या धुरामुळे स्थानिक रहिवाशांच्या डोळ्यांना त्रास होत आहे. डोळे जळजळत असून भयंकर विषारी केमिकलची दुर्गंधी पसरली आहे. या धुरावर अग्निशमन व्यवस्थापणाने नियंत्रण मिळवले नाही तर नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल असे दिवेकर नागरिकांनी सांगितले.

दिव्याचे डम्पिंग ग्राऊंड काही बंद होत नसल्याल्‍याचे दिसत आहे, त्‍यातच भर  म्‍हणून की काय, डम्पिंग शेजारी आता केमिकलने भरलेल्या गोण्या टाकण्यात आल्या आहेत. त्या गोण्यांना आग लागल्यामुळे केमिकलचा विषारी धूर सर्वत्र पसरला आहे. याठिकाणी काही महिन्यांपूर्वी देखील विषारी केमिकलचे ड्रम टाकण्यात आले होते. आता गोणी टाकण्यात आल्याने नागरिक संतापले आहेत.
दिवा डम्पिंग ग्राऊंड परिसर खर्डी पुलाजवळ विषारी केमिकलच्या गोणी टाकण्यात आल्या असल्याची माहिती नागरिकांनी पालिका प्रशासनाला दिली आहे. मागील वर्षी देखील या ठिकाणी विषारी केमिकल टाकण्यात आले होते. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. आता पुन्हा असाच प्रकार घडल्याने दिवा शहरातील स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त केला आहे. भाजपचे रोहिदास मुंडे यांनी याबाबत ठाणे मनपा आयुक्तांची भेट घेऊन दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.