होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीची माया जळून खाक

डोंबिवलीची माया जळून खाक

Published On: Mar 23 2018 12:00AM | Last Updated: Mar 23 2018 12:00AMडोंबिवली : प्रतिनिधी

शहराच्या पूर्वेकडील पी अँड कॉलनी परिसरात असलेल्या माया फरसाण या चिवडा, मिठाई, फरसाण बनविण्याच्या दुकानाला गुरूवारी रात्री उशिरा अचानक आग लागली. या आगीत सदर दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीचे वृत्त कळताच केडीएमसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग काही तासांतच आटोक्यात आणली. ही आग बहुदा तेलाच्या कढईत टाकलेल्या पाण्याच्या शिडकाव्यानंतर पेटलेल्या भडकली असावी असा संशय असून या संदर्भात अधिक तपास करण्यात येत आहे.
 

 

tags : mumbai, mumbai new, fire at shop, maya sweet mart shop,