Mon, Jul 22, 2019 04:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोरेगाव इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये गोदामांना भीषण आग

गोरेगाव इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये गोदामांना भीषण आग

Published On: Feb 07 2018 1:13PM | Last Updated: Feb 07 2018 1:19PMमुंबई - प्रतिनिधी

मुंबईतील गोरेगाव भागात असलेल्या इटालियन इंडस्ट्रीयल इस्टेटमधील गोदामाला सकाळच्या सुमारास भीषण आग लगाली. आज सकाळी अचानक आग लागली, त्यानंतर ही आग वेगाने पसरली त्यामुळे थोड्याच वेळात आगीने रौद्ररुप धारण केले. यात अद्याप जीवितहानी झाली नसल्याचे समजते. मात्र, गोदामांतील मालांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. 

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने या ठिकाणी तातडीने धाव घेतली. आठ फायर इंजिन आणि सहा पाण्याचे बंब आग नियंत्रणात आणली. आग मोठ्या प्रमाणावर पसरल्याने त्यावर नियंत्रण मिळण्यासाठी सख्तीचे प्रयत्न करावे लागले. या गोदामात अडकलेल्या १५ जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या आगीत दोन गोदामे भस्मसात झाली आहेत. ही आग नेमकी का लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.