Mon, Jun 24, 2019 21:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दहावीचे पाचही पेपर व्हॉट्स अ‍ॅपवर आले

दहावीचे पाचही पेपर व्हॉट्स अ‍ॅपवर आले

Published On: Mar 22 2018 1:43AM | Last Updated: Mar 22 2018 1:43AMमुंबई : प्रतिनिधी

दहावी बोर्डाचा सोमवारचा इतिहास, राज्यशास्त्र पेपर लीक केल्याप्रकरणी बदलापूर येथून  रोहित अमुलराज सिंग या  शिक्षकाला आंबोली पोलिसांनी बदलापूरहून अटक केली. त्याला बुधवारी अंधेरी येथील लोकल कोर्टाने 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

अंधेरीतील विरा देसाई मार्गावरील एमव्हीएम स्वामी मुक्तानंद हायस्कूलमध्ये सोमवारी इंग्रजी माध्यमाचा इतिहास, राज्यशास्त्र-1 पेपर होता. परीक्षा सुरु होण्यापूर्वीच तीन विद्याथ्यार्ंपैकी एका विद्यार्थ्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर हा पेपर आला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आंबोली पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. भरत गायकवाड, दया नायक व त्यांच्या पथकाने दहावीच्या आठ विद्यार्थ्यांसह अन्वरउल हसनश्र अजंरुल हसन शेख, इम्रान सुलेमान शेख आणि फिरोज अब्दुल माजिद खान या तिघांना अटक केली. यातील फिरोज खान याचा बदलापूर येथे ब्रिलियंट नावाचा एक खासगी क्‍लास आहे. याच क्‍लासमध्ये रोहित सिंग हा शिक्षक म्हणून काम करीत होता. त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस येताच मंगळवारी रात्री उशिरा त्याला दया नायक व त्यांच्या पथकाने बदलापूर येथून अटक केली. रोहित सिंग हा बदलापूर कुळगावला, शिवाजी चौक, शांती सदन अपार्टमेंटच्या बी/1, रुम क्रमांक 16 मध्ये राहतो. दहावी बोर्डाचे पेपर असल्याने फिरोजने रोहितला 1 मार्च ते 24 मार्चपर्यंत क्‍लासला नियमित येण्यास सांगितले होते. फिरोजने गणित, भूमिती, विज्ञान एक आणि अन्य दोन विषयांचे पेपर परिक्षेच्या दिवशी पेपर सुरु होण्याच्या एक ते पावणेदोन तासापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवले.

 त्याने क्‍लासच्या पाच ते सात विद्यार्थ्यांना सकाळी आठ ते दहा या कालावधीत विशेष क्‍लास घेऊन पाठविलेल्या पेपरमधील प्रश्‍न महत्त्वाचे म्हणून शिकवले. ही प्रश्‍नपत्रिका नंतर रोहितने त्याच्या व्हॉट्सअ‍ॅपमधून डिलीट केली. आता डिलीट झालेला मजकूर परत मिळवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत.