Wed, Jun 26, 2019 12:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सावत्र मुलीवर अत्याचार करणार्‍या पित्याला अटक   

सावत्र मुलीवर अत्याचार करणार्‍या पित्याला अटक   

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 23 2018 12:50AMमुंबई : प्रतिनिधी

गेल्या एक वर्षांपासून सावत्र मुलीवर तिच्याच पित्यानेच लैगिंक अत्याचार केल्याची संतापजनक घटना धारावी परिसरात घडली. हा प्रकार एका शिक्षिकेच्या लक्षात येताच तिने पिडीत तरुणीच्या मदतीने पोलिसांत धाव घेतली आणि सावत्र पित्याविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल होताच 44 वर्षांच्या आरोपी सावत्र पित्याला धारावी पोलिसांनी अटक केली. 

अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने 31 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. पिडीत तरुणी ही धारावी परिसरात तिची आई, बहिण, भाऊ आणि सावत्र पित्यासोबत राहते. काही महिन्यांपासून तिची आई आजारी होती, त्यामुळे ते सर्वजण तिचा सांभाळ करीत होते. एक महिन्यांपूर्वीच तिची प्रकृती ढासळली आणि रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. 

आई आजारी असल्याने तिचा दुसरा पती आणि पिडीत तरुणीचा सावत्र पिता हा गेल्या एक वर्षांपासून तिच्यावर रात्री उशिरा लैगिंक अत्याचार करीत होता. नंतर तो एक बहिण शाळेत गेल्यावर मुलाला दुकानात पाठवून तिच्यावर दिवसाही लैगिंक अत्याचार करीत होता. गेल्या एक वर्षांपासून सावत्र पित्याकडून सुरु असलेल्या या लैगिंक अत्याचाराला ती प्रचंड कंटाळून गेली होती. पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी झाली असून लवकरच आरोपीचीही वैद्यकीय तपासणी होणार आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट  उसळली होती.