Tue, Mar 19, 2019 11:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेतकरी आंदोलन भडकवण्यामागे शरद पवार

शेतकरी आंदोलन भडकवण्यामागे शरद पवार

Published On: Jun 06 2018 2:09AM | Last Updated: Jun 06 2018 2:03AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

शेतकरी नेत्यांच्या मागे लपून छुप्या पध्दतीने शेतकरी आंदोलन भडकविण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करीत आहेत. त्यामुळेच त्यांनी शेतकर्‍यांना टोकाला जाण्याचा सल्ला दिला आहे, अशी टीका करतानाच शेतकर्‍यांवर काँग्रेस ˆ राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचारामुळेच ही परिस्थिती ओढवली असल्याचे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. 

शरद पवार यांनी शेतकर्‍यांना मागण्या मान्य करुन घेण्यासाठी टोकाला जाण्याचा सल्ला सोमवारी दिला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी आंदोलन कसे भडकेल यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, आपल्या सरकारने शेतकर्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाण्याची भूमिका घेतली आहे. जेवढी तूर खरेदी या वर्षात झाली तेवढी तूर काँग्रेस ˆ राष्ट्रवादी काँग्रेसने पंधरा वर्षातही खरेदी केली नसेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते. राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभे रहाण्याची भूमिका घेतली आहे. गारपीट असो की दुष्काळी अनुदान असो, राज्य सरकारने शेतकर्‍यांना संकटकाळात मदत केली आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतकर्‍यांचे उत्पादन वाढत आहे. वाढलेल्या उत्पादनाला भाव देणे हे सरकारपुढे आव्हान आहे. राज्य सरकार शेती उत्पादनाला जादा भाव कसा देता येईल, यासाठी प्रयत्न करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.