Tue, Sep 25, 2018 14:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रालयात विष प्राशन केलेल्या धर्मा पाटील यांचे निधन

मंत्रालयात विष प्राशन केलेल्या धर्मा पाटील यांचे निधन

Published On: Jan 29 2018 12:11AM | Last Updated: Jan 29 2018 12:11AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

संपादित जमिनीसाठी योग्य तो मोबदला न मिळाल्याच्या कारणावरून धुळे जिल्‍ह्यातील धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन केले होते. आज अखेर येथील जे.जे. रुग्‍णालयात ८० वर्षीय धर्मा पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला. तर वडिलांना शहीद भूमिपुत्र शेतकर्‍याचा दर्जा लेखी स्‍वरुपात मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

धुळे जिल्‍ह्यातील विखरणचे शेतकरी असणार्‍या धर्मा पाटील यांनी २२ तारखेला रात्री उशिरा मंत्रालयासमोर विष प्राशन केले होते. त्यांच्यावर जे.जे. रुग्‍णालयात उपचार सुरू होते. या दरम्यान त्यांचे डायलिसीसही करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर त्यांचा आज रात्री मृत्यू झाला. 

मुलगा नरेंद्र पाटील याने वडिलांचा अवयवदानाचा अर्ज भरला होता. त्यानुसार निकामी न झालेले अवयव दान करण्यात येणार आहेत. जमिनीचा योग्य मोबदला आणि धर्मा पाटील यांना शहीद भूमिपुत्र शेतकरीचा दर्जा जोपर्यंत मिळत नाही, असे लेखी आश्वासन दिले जात नाही, तोपर्यंत वडिलांचा मृतदेह स्‍वीकारणार नाही, अशी भूमिका नरेंद्र पाटील यांनी घेतली आहे.