Sun, Mar 24, 2019 13:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पत्रास कारण की...प्‍लास्‍टिकबंदी!

पत्रास कारण की...प्‍लास्‍टिकबंदी!

Published On: Jun 05 2018 9:33AM | Last Updated: Jun 05 2018 9:33AM►पर्यावरण मंत्र्यांचे पत्र 

आजकाल पत्र लिहिण्याचा योग तसा र्दुीळच.... कारण आता आपला संवाद सोशल मीडियावरून जास्त होत असतो. पण आज मात्र पत्राने संवाद साधणं गरजेचं होतं. कारण काही बातम्याुंळे माणसाच्या मनाच्या संवेदना बोथट झाल्या की काय असा प्रश्‍न पडतो. मुक्या प्राण्यांचा जीव आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे जात असेल तर अशा घटना घडल्यानंतर डोळ्यात येणारं माणुसकीचं पाणी गोठून गेलं की काय असा प्रश्‍न पडतो.

कोकण किनारपट्टीवर भला मोठा व्हेल मासा मृत अवस्थेत आढळून आला. त्याच्या पोटात कित्येक किलो प्लास्टिक आढळून आलं, सार्वजनिक ठिकाणी गायी-गुरांनी प्लास्टिक पिशवीतील अन्न खाताना प्लास्टिक पिशव्या पोटात गेल्यानं त्यांचा मृत्यू ओढवला,तर कधीही न विसरता येणारा जुलैचा महिना, अतिवृष्टीमुळे मुंबईला पडलेला महापुराचा विळखा यालाही प्लास्टिक पिशवीच कारणीभूत असल्याचं स्पष्ट झालं होतं. प्लास्टिक कचरा जाळल्यानं त्यातून निर्माण होणार्‍या विषारी वायुुळे कॅन्सरसारखे आजार उद्भवतात. राज्यात अंदाजे बाराशे टन प्रतिदिन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. यामुळे प्लास्टिक प्रदूषणाची किती गंभीर समस्या आहे हे आपल्या लक्षात येईल.

खरं तर यानंतर राज्यशासनानं मायक्रोनपेक्षा कमी प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करण्यासाठी साली कायदा केला. पण तरी देखील आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे प्लास्टिक पिशव्यांचं वापराचं प्रमाण कमालीच वाढलं आहे. प्लास्टिक पिशवीचं कचर्‍यात रुपांतर झाल्यानंतर शेकडो वर्षे या पिशव्यांचं विघटन होत नाही ही गंभीर बाब आपण कशी विसरु शकतो. याच प्रमाणे थर्माकोल किंवा प्लास्टिकचे कप्स, ग्लास, त्याचबरोबर थर्माकोलच्या प्लेट्स याचा एकदा वापर केल्यानंतर त्या कचर्‍याची विल्हेवाट लावणं अवघड होऊ लागलं आहे. म्हणूनच या बदलत्या पर्यावरणाची दखल घेण्यासाठी आपण राज्यात प्लास्टिक व थर्माकोलबंदीचा निर्णय घेतला आहे.

प्लास्टिक कचर्‍यामुळे निर्माण होत असलेल्या प्रश्‍नाविषयी सौ. अमृता फडणवीस व सिनेअभिनेत्री जूही चावला यांच्याबरोबर अनौपचारिक चर्चेत या प्रश्‍नाविषयी त्यांनी केलेलं अभ्यासपूर्ण सादरीकरण याने या विषयाची गंभीरता लक्षात आली होती. तर वर्तानातील तरुण पिढी या प्रश्‍नाकडे किती गांभीर्याने पाहात आहे आणि त्यांना बदलत्या पर्यावरणाची सजग जाणीव किती आहे याचा अभ्यासपूर्ण वस्तुपाठ म्हणजे युवा नेते मा. आदित्य ठाकरे यांची प्लास्टिक कचर्‍याच्या प्रश्‍नाबाबतची तळमळ त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. प्लास्टिकबंदीच्या निर्णयापूर्वी वारंवार केलेल्या चर्चेतून राज्याचे मा. मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांचं मिळालेलं वैचारिक बळ व भरभक्कम पाठिंबा ही मोलाची बाब आहे. तर कला आणि निसर्गाशी ज्याचं पिढीजात जीवाभावाचं नातं आहे असे मा. उद्धवजी ठाकरे यांनी आपण बदलत्या पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे व त्याकरीता राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक हिताचे निर्णय ही आपली नैतिक बांधिलकी आहे अशी त्यांची आग्रही दूरदृष्टी त्यामुळे प्लास्टिकबंदीचा हा निर्णय राजकारण, सत्तास्थान याच्या पलीकडचा आहे असं मला वाटतं.

बदलतं हवामान, बदलतं पर्यावरण याचा सामना करण्यासाठी समृद्ध पर्यावरणाच्या निर्मितीकरीता अशा निर्णयाची नितांत गरज होती. या निर्णयाचं समाजातील सर्व स्तरांतून स्वागत झालं आहे. यानं काम करायला बळ मिळालं आहे याचा आनंद वाटतो. या निर्णयाची अंलबजावणी करण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. कारण हा निर्णय हा केवळ एका विभागाचा, केवळ शासनाचा इतकाच मर्यादित नसून त्याची अंलबजावणी करण्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधी, समाजातील सर्व घटक, सर्व नागरिक आपण प्रत्येकानं सजग राहायला हवं.

सज्जनहो, प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची अंलबजावणी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या दृढ संकल्पाची व निश्‍चयाची जोड हवी. कारण आपला एक अचूक निर्णय व त्याची प्रभावी अंलबजावणी ही समृद्ध पर्यावरणाची गुरुकिल्ली आहे. सज्जन हो, माझा हा संवाद ही आपल्या प्रत्येकाच्या मनातील भावना शब्दात व्यक्त करणारा पत्रप्रपंच आहे. वर्तानातील बदलत्या पर्यावरणाच्या प्रखर वास्तवाची जाणीव झाल्यानंतर काळ आणि वेळ याची सांगड घालत त्यावर योग्य निर्णय घेणं हीच खरी निसर्गाची पूजा ठरणार आहे. आपण सर्वांनी निश्‍चय करुया श्रद्धा, सबुरी, सातत्य, प्रयत्न व त्याला सकारात्मक कृतिशील आचरणाची जोड देऊन समृद्ध पर्यावरणाचे रक्षण करुया.

आपला स्नेहांकित                    
रामदास कदम, पर्यावरण मंत्री, महाराष्ट्र राज्य