Sun, Jul 21, 2019 16:15
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बालभवनातील कर्मचार्‍यांचे पैसे खात्यातून गायब

बालभवनातील कर्मचार्‍यांचे पैसे खात्यातून गायब

Published On: Feb 08 2018 1:48AM | Last Updated: Feb 08 2018 1:27AMमुंबई : प्रतिनिधी

चर्नीरोड येथील शासकीय मुद्रणालय, शालेय शिक्षण विभागाच्या चर्नी रोड येथील जवाहर बालभवन येथील  शिक्षण विभागाच्या कर्मचारी-अधिकार्‍याचे 10 हजारांपासून ते 80 हजार रुपये बँक खात्यातून गायब झाले आहेत.  

मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग, शासकीय मुद्रणालय या विभागातील 30 ते 40 कर्मचार्‍यांच्या खात्यातून प्रत्येकी 15 ते 80 हजार रुपयांप्रमाणे लाखो रूपये वळते झाल्याची धक्कादायक माहिती आहे. दरम्यान या प्रकरणी, मुंबईतील मरीन लाइन्स व ठाण्यातील मानपाडा पोलीस ठाण्यात कर्मचार्‍यांनी अधिकार्‍यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.

चर्नीरोड येथील शालेय शिक्षण विभागातील विभागीय शिक्षण उपसंचालक पौर्णिमा गेडाम यांनी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यांचे 15,500 रुपये परस्पर कपात केली आहे. त्यांच्याच कार्यालयातील सहायक शिक्षण उपसंचालक असलेले एस.डी. मुजावर यांच्या खात्यातून 80 हजार रुपये गायब झाले आहेत. प्राथमिक शिक्षण परिषदेतील एका शिपाई महिलेचेही 7 हजार रुपयांचा पगार गायब झाला आहे. बँक ऑफ इंडिया व अँक्सिस बँकेच्या खात्यातील हे पैसे काढल्याची तक्रार आहे.  रविवारपासून कर्मचार्‍यांच्या खात्यातील पैसे गायब होत असल्याच्या घटना घडत असल्याने या कार्यालयातील कर्मचारी आपल्या खात्यातूनही पैसे वळते होणार नाहीत ना? अशी भीती व्यक्‍त करीत आहेत.

एकाच ठिकाणावर असलेल्या तीन वेगवेगळ्या बँकेतील एटीएममधून कॅश काढल्याने त्यानंतर हजारो रुपये खात्यातून गायब होत असल्याने मोठे रॅकेट असले पाहिजे अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे चर्नीरोड येथील शासकीय कर्मचारी हवालदिल झाले आहेत.