Fri, Jul 10, 2020 18:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पनवेल : वडिलांनी बाईक न दिल्‍याने मुलाने स्‍वत:ला पेटवले

पनवेल : वडिलांनी बाईक न दिल्‍याने मुलाने स्‍वत:ला पेटवले

Last Updated: Nov 15 2019 12:54PM
पनवेल : प्रतिनिधी  

वडिलांनी बाईकचा हट्ट पूर्ण न केल्यामुळे इयत्‍ता अकरावीच्या वर्गात शिकणार्‍या एका विद्यार्थ्याने शाळेत जाऊन स्वतःला पेटवून घेतले. ही घटना कळंबोली मधील सुधागड शाळेत घडली आहे. यामध्ये हा विद्यार्थी 80 टक्के भाजला आहे. ऐरोली येथील बर्न सेंटरमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

शिवम यादव असे विद्यार्थ्यांचे नाव आहे. शिवम यादव हा 11 च्या विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. शिवम ने वडिलांना बाईक मागितली होती, मात्र वडिलानी शिवमला बाईक घेऊन दिली नव्हती. याचा मनात राग ठेवून आज शिवम घरातून सकाळी शाळेत जाण्यासाठी बाहेर पडला. त्‍याने शाळेत गेल्या नंतर, स्वतः सोबत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेऊन पेटवून घेतले, त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी शिवमला वाचवण्याचा प्रयत्न केला, आग विजल्यानंतर शिवमला एम जी एम रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर ऐरोली येथील बर्न सेंटरमध्ये शिवमला उपचारासाठी नेण्यात आले आहे.